तो जातो तेव्हा...
त्याच्याशी खूप बोलायच असत.
दोन दिवस अजून सोबत राहायच असत.
तो जातो तेव्हा त्याला थांबवायच असत.
मन भरून रडायच असत.
त्याला काही सांगायच असत.
तो जातो तेव्हा त्याला थांबवायच असत.
तो गेल्यावर पुन्हा एकटाच राहायच असत.
त्याची वाट बघत जगायच असत.
तो जातो तेव्हा त्याला थांबवायच असत.
वेळेला पुन्हा मागे करायच असत.
त्याच्या सोबत फिरायच असत.
तो जातो तेव्हा त्याला थांबवायच असत.
मन भरून त्याला बघायच असत.
पोहचल्यावर निरोप पाठवायला सांगायच असत.
तो जातो तेव्हा त्याला थांबवायचे असत.
:-Pranav Vispute PV