पुन्हा लहान होयच आहे मला.
पुन्हा बोबड बोलायचय मला.
सर्वानचा लाडका होयचय मला.
पुन्हा त्या छोट्याश्या हातात जग सामवुन घेयचय
मला.
तिच मस्ती करायचीय मला.
पुन्हा लहान होयच आहे मला.
पुन्हा आईच्या कुशीत निजायचय मला.
पप्पांच्या खांद्यावर बसून फिरायचय मला.
पुन्हा शाळा शिकायची आहे मला.
तेच मित्र बनवायचे आहे मला.
पुन्हा लहान होयच आहे मला.
पुन्हा मित्र या शब्दा चा अर्थ समजुन घ्यायचा
आहे मला.
या आकाशात बेभान होऊन उडाय चे आहे मला.
पुन्हा खेळन्या करता हट्ट करायचाय मला.
त्या छोट्याश्या पायाने पळायचे आहे मला.
पुन्हा लहान होयच आहे मला.
पुन्हा कुत्र्याला भुई म्हणायचे आहे मला.
पाण्याला म मम म्हणायचय मला.
पुन्हा झाडावर चढून पेरू तोडायचे आहे मला.
माती माती खेळायची आहे मला.
पुन्हा पुन्हा लहान होयच आहे मला.
पुन्हा तोच प्रणव बनायचय मला.
:- Pranav Vispute PV